वैभव राऊतसह अटकेत असलेले इतरजण सनातनचे साधक नाहीत – सनातन

180

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – वैभव राऊतसह अटकेत असलेले इतरजण सनातनचे साधक नाहीत असा दावा सनातन संस्थेकडून करण्यात आला आहे. सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी पत्रकार परिषदेत घेऊन ही माहिती दिली. ‘आमच्याविरोधात ज्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्यासाठी कायदेशीर मार्गाचा आधार घेणार आहोत. बदनामी केल्यास कायदेशीर कारवाई करु असा इशारा यावेळी सनातनकडून देण्यात आला आहे’.

काही दिवसांपूर्वी वैभव राऊत याच्या नालासोपाऱ्यातील घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली होती. यानंतर अनेकांना अटक करण्यात आली असून त्यांचा संबंध डॉ नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येशी असल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभुमीवर सनातनकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

तपासात थेटपणे सनातनचे नाव अद्याप आलेले नाही. सनातलना टार्गेट केले जात आहे असा आरोप सनातनकडून करण्यात आला असून खोट्या गोष्टी पसरवल्या जात असतील तर थांबवण्यात याव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले. हा आमच्यावरील अन्याय आहे. सनातनमुळे कधीच जातीय तेढ निर्माण झालेले नाही. आम्ही देशाच्या सुरक्षेत अडथळा आणलेला नाही असेही ते यावेळी म्हणाले.