वैभव राऊतच्या घराची पुन्हा झडती; इनोव्हा कार जप्त

433

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – स्फोटके आणि शस्त्रसाठ्यासह अटक केलेला हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता वैभव राऊत याच्या नालासोपारा येथील घराची आणि व्यावसायिक गाळ्याची एटीएसने बुधवारी (दि.१५) पुन्हा झाडाझडती घेतली.  यावेळी वैभवची इनोव्हा कार देखील ताब्यात घेण्यात आली. याच कारमधून त्याने गावठी बॉम्ब आणि शस्त्रांची वाहतूक केल्याचा एटीएसला संशय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैभवला बुरखा घालून एटीएसने बुधवारी दुपारी नालासोपाऱ्यातील त्याच्या घरी आणले होते. त्यांनंतर दुपारी ३ च्या दरम्यान वैभवच्या घराची झडती सुरू केली. पावणेचार वाजता ते त्याला घेऊन निघून गेले.  एटीएसने वैभवची इनोव्हा कारची कागदपत्रे आणि कार ताब्यात घेतली. या वेळी चार एअर पिस्तुल, छऱ्यांचे बॉक्स, सीमकार्ड, लॅपटॉप, सीपीयू आदी साहित्यही जप्त करण्यात आल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा दिली आहे.