वैभव राऊतचा साथीदार सुधन्वा गोंधळेकर याच्या पुण्यातील घरातून ६ हॉर्डडिक्स आणि ५ मोबाईल जप्त

251

पुणे, दि. १३ (पीसीबी) – हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता वैभव राऊतचा साथीदार सुधन्वा गोंधळेकर याच्या पुण्यातील घरातून एटीएसने एक लॅपटॉप, ६ हार्डडिक्स, ५ पेनड्राईव्ह, ९ मोबाईल, अनेक सिमकार्ड्‍स, १ वायफाय डोंगल, १ कार, १ मोटार सायकल व अनेक दस्ताऐवज जप्त केले आहेत.

एटीएस सध्या सुधन्वा गोंधळेकरची कसून चौकशी करत असून आजून काही धागे-दोरे हाती लागतात का यावर काम करत आहेत. जप्त करण्यात आलेल्या साहित्यावरुन सुधन्वा गोंधळेकर हा टेक्निकल एक्सपर्ट असल्याची माहिती समोर येत आहे.