वेटर, दरबान म्हणून मावळ्यांच्या वेशभूषेतील कामगारांची नेमणूक करु नका; ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांची मागणी

79

पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) – हॉटेल्स, मंगल कार्यालय, विविध समारंभाच्या वेळी शिवकालीन वेशभूषेतील मावळ्यांना वेटर, दरबान म्हणून केली जाणारी नेमणुक अयोग्य आहे. यामुळे छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांची विटंबना होत असून हा प्रकार तातडीने थांबवावा अशी जोरदार मागणी जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा स्थायी समितीच्या माजी सभापती नगरसेविका सीमा सावळे यांनी केली आहे.