वृद्ध महिलेस लाकडाने मारहाण

64

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – तिघांनी मिळून एका वृद्ध महिलेला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री साडेआठ वाजता इंदिरानगर, चिंचवड येथे घडली.

अविनाश भाऊ भोसले (वय 28), मीरा भाऊ भोसले (वय 50), सोनम भाऊ भोसले (वय 21, तिघे रा. इंदिरानगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 68 वर्षीय वृद्ध महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपींनी आपसात संगनमत करून अविनाश याने फिर्यादी वृद्ध महिलेला लाकडी दांडक्याने मनगटावर मारून गंभीर जखमी केले. तर आरोपी मीरा आणि सोनम यांनी वृद्ध महिलेस जमिनीवर पाडून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीचे कारण समजू शकले नाही. पोलीस हवालदार सोनमाळी तपास करीत आहेत.

WhatsAppShare