‘वीरे दि वेडिंग’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई

321

मुंबई, दि.२ (पीसीबी) – ‘वीरे दि वेडिंग’ या सोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘वुमन सेंट्रिक’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई केली आहे. ‘वीरे दि वेडिंग’ ने बॉक्स ऑफिसवर १० कोटी  ७० लाख रुपयांचे कलेक्शन केले आहे.

शशांक घोष दिग्दर्शित, एकता कपूरची सहनिर्मिती असलेला ‘वीरे दि वेडिंग’ हा चित्रपट शुक्रवार १  जून २०१८  रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या सिनेमाने देशभरात १०.७ कोटींचा गल्ला जमवला. लग्नाच्या निमित्ताने पुन्हा भेटलेल्या चार मैत्रिणींची ही गोष्ट आहे. एकता कपूरने कमाईचे आकडे ट्वीट करुन आनंद व्यक्त केला आहे. सिनेमा फक्त तीन गोष्टींवर चालतो – एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट और एन्टरटेनमेंट… असे तिने ट्वीट केले आहे. सोनम आणि स्वरा भास्कर यांनीही पहिल्या दिवशी कमाईचे आकडे ‘डबल डिजीट’मध्ये गेल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

वीरे दि वेडिंगने पहिल्या दिवशी चांगला गल्ला जमवल्यामुळे वीकेंडला सिनेमा चांगली कमाई करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.