विविध क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येऊन जोपासला गायनाचा छंद; उत्कृष्ट जुन्या गीतांची दिली प्रेक्षकांना मेजवानी

317

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – कामाचा व्याप आटपून आपल्या गायनाचा छंद जोपासणाऱ्या उत्कृष्ट अश्या एकूण ४० विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि पुरुष गायकांनी जुन्या गीतांची प्रेक्षकांना मेजवानी दिली. हा कार्यक्रम रविवारी सायंकाळी वल्लभनगर येथील स्वर्गीय मंगलसेन बहल विरंगुळा केंद्र येथे संपन्न झाला.

या वेळी प्रेक्षकांनी मनमुरादपणे गाण्यांचा आनंद घेतला आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे आयोजन चंद्रा पवार, रवींद्र कांबळे, शैलेश गावटे, नितीन कदम, केशव त्रिभुवन, जितेंद्र बारहाते, शिवाजी वाघमारे यांनी विशेष मेहनत घेऊन केले. ज्याला ‘सपतक प्रस्तुत यादे सुनहेरी’, असे नाव देण्यात आले होते.

तसेच या कार्यक्रमात नवोदित अशा ४० कलाकारांनी सराव करून उत्कृष्ट असे मनाला भिडणारे, मंत्रमुगद करणारे हिंदी आणि मराठी भाषेतील जुने गीत सादर केले. यामध्ये शिक्षक, डॉक्टर, व्यावसायिक, कामगार आदी क्षेत्रातील कलाकारांचा मोठया संख्येने समावेश होता.

WhatsAppShare