विवाहीत महिलेचा शारीरिक छळ व मारहाण केल्याप्रकरणी सासरकडच्यांविरोधात गुन्हा दाखल

214

वाकड, दि.२९ (पीसीबी) – विवाहीत महिलेला मारहाण आणि शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरकडच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनदयाल बावनकर (पती), शारदा बावनकर (चुलत सासू),  बाबूलाल बावनकर (सासरा), हरीदयाल बावनकर (दिर), धर्मेंद्र धांडुलाल बावनकर (चुलत दिर) हे सर्व आरोपी राहणार मु.पो सालेटेका, हट्ट रोड,ता किरणापूर, जि बालाघाट, मध्यप्रदेश, अद्याप अटक केलेली नाही.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (वय २८) जानेवारी २०१५ रोजी दिनदयाल बावनकर यांच्यासोबत लग्न झाले असून २०१५ पासून ते  मार्च २०१९ पर्यंत लग्नातील राहिलेली रक्कम माहेरावरून घेऊन ये तु चांगला स्वयंपाक करत नाही विविध कारणाने शारीरिक व मानसिक छळ  मारहाण करून पिडीतेला घराबाहेर काढले. अशी पिडीतेने पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणी पिडीतीच्या तक्रारीनुसार सासरकडच्यांविरोधात वाकड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सा.पोलिस निरीक्षक पवार करीत आहे.