विवाहित महिलेला शिवीगाळ करून दमदाटी आरोपीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

136
संग्रहित

मळवली, दि.१४ (पीसीबी) –  जुन्या भांडणाचा राग मनात धरून विवाहित महिलेला शिवीगाळ करून दमदाटी केल्याची घटना दि.१३ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास दत्तमंदिर, देवले या ठिकाणी घडली. याप्रकरणी आरोपी विरोधात लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

साहेबराव ओझरकर (रा.देवले, ता. मावळ, जि. पुणे) असे या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (वय २३ वर्षे) यांच्या तक्रारीनुसार, एकमुखी दत्त मंदिरामध्ये दि.१३ गुरूवार रोजी भंडाराचा कार्यक्रम होता. फिर्यादी मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेली असता आरोपी साहेबराव ओझरकर (एकमुखी दत्त ट्रस्ट अध्यक्ष, देवले) याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून महिलेला शिवागाळ करून दमदाटी केली असे या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपीविरोधात लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस अधिकारी संदिप भाऊराव घोरपडे करीत आहे.