विवाहित महिलेला पैशाची मागणी व शारीरिक छळ केल्याप्रकरणी सासरकडच्यांविरोधात गुन्हा दाखल

203

निगडी, दि.३१ (पीसीबी) – विवाहित महिलेला व्यवसाय करण्यासाठी ८० लाख रूपयांची मागणी व शारीरिक मानसिक छळ करून तिला मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी सासरकडच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश आकाराम सुर्यवंशी (पती), सुंगदा आकाराम सुर्यवंशी (सासू), आकाराम विठोबा सुर्यवंशी (सासरे), रा. सेक्टर नं.२१, जान्हवी बंगला, प्लॅट नं.५७८, यमुनानगर, निगडी, पुणे. असे या आरोपींची नावे आहेत. (आरोपींना अद्याप अटक नाही.)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (वय ३० वर्षे) पती महेश यांनी व्यवसाय करण्यासाठी तुझ्या वाट्याची जमिन विकून माहेरकडून ८० लाख  रूपये घेऊन ये अशी मागणी पतीने केली. त्यास पिडीतीने नकार दिला असता त्यांना अपमानास्पद बोलून त्यांना मारहाण करून शिवीगाळ शारीरिक व मानसिक छळ केल्याचे पिडीतीने पोलिसांना सांगितले आहे आणि लग्ना मध्ये साडे पाच तोळे दिलेले दागिने सुध्दा त्यांनी परत दिले नाही असाही आरोप पिडीतीने केला आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीनुसार सासरकडच्याविरेधात निगडी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास सा.पोलिस निरीक्षक आरदवाड करीत आहेत.