विवाहित महिलेची छेड काढून तिला मारहाण

253

खेड, दि.२७ (पीसीबी) – मनोज खराबी यांच्या कार्यालयाच्या समोरून जात असताना एका विवाहित महिलेची छेड काढून तिला मारहाण केल्याची घटना दि.२५ रोजी खराबवाडी, खेड येथे घडली. आरोपी अद्याप अटक नाही.

शाम कड असे या आरोपीचे नाव आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ( वय २५)  मनोज खराबी यांच्या कार्यालयाच्या समोरून बाजूने जात असताना आरोपी शाम कड याने विवाहित महिलेला आवाज दिला मात्र प्रतिसाद दिला नाहि म्हणून संतापलेल्या शाम कड याने पिडीतेची ओढणी ओढून हात पकडून लज्जा उत्पन होईल असे कृत्य केले आणि तिला शिवीगाळ करून तिच्या पोटात दगडाने मारहाण करून तिला जखमी केले. जाब विचारण्यासाठी आलेल्या पतीला आणि मित्राला आरोपीच्या चार ते पाच साथीदारांनी (नाव पत्ता माहिती नाहि) त्यांनी  लाथा बुक्क्यांनी लोखंडी राडने त्या दोघांना मारहाण करून जखमी केले आणि ‘तुला सोडणार नाहि’ अशी धमकीही त्यांना देण्यात आली. पिडीतेच्या तक्रारीनुसार ओरीपींविरोधात चाकण पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सपकाळ करीत आहे.