विवाहितेच्या छळ प्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल

68

निगडी, दि. १३ (पीसीबी) – व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. त्यानंतर माहेरच्या लोकांनी व्यवसाय सुरु करून दिला. त्यानंतर पतीने व्यवसाय बंद करून पुन्हा माहेरहून पैसे आणण्याची विवाहितेकडे मागणी केली. त्यावरून तिचा छळ केला. ही घटना 15 डिसेंबर 2003 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत शिवाजीनगर पुणे आणि म्हाळसाकांत चौकाजवळ आकुर्डी येथे घडली. याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती चेतन नरेश डहाणूकर (रा. शिवाजीनगर, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सासरी असताना पतीने व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. यावरून त्याने दीड ते दोन वर्ष त्रास दिला. त्यानंतर फिर्यादी यांच्या वडिलांनी आरोपीला व्यवसाय सुरु करून दिला. तो व्यवसाय आरोपीने व्यवस्थित सांभाळला नाही. व्यवसाय बंद झाला. त्यानंतर पतीने नेहमी दारू पिऊन घरी येत फिर्यादी महिलेला माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत शिवीगाळ व मारहाण केली. राहत असलेला फ्लॅट नावावर करून दे नाहीतर तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली. पतीने लोकांची उधारी केली असून त्यासाठी देखील फिर्यादी यांना मानसिक त्रास होत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare