विवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

144

चिंचवड, दि. 17 (पीसीबी): किरकोळ कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याबाबत सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती अविनाश सुरेश मोरे आणि पाच महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मे 2019 ते 13 सप्टेंबर 2021 या कालावधीत घोरपडी पुणे येथे हा प्रकार घडला आहे. फिर्यादी यांचे लग्न झाल्यापासून आरोपींनी आपसात संगनमत करून त्यांना किरकोळ कारणावरून शारीरिक व मानसिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत

WhatsAppShare