विवाहितेचा छळ करून घरातून दिले हाकलून..

92

चाकण, दि. १४ (पीसीबी) – विवाहितेचा छळ करून तिला घरातून हाकलून दिले. त्यानंतर विवाहितेच्या एका नातेवाईकाने तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना जानेवारी 2018 ते 13 जानेवारी 2022 या कालावधी महाळुंगे आणि विविध ठिकाणी घडली.

याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू, नणंद आणि दोन काका यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी घरगुती कारणांवरून फिर्यादी विवाहितेला मारहाण केली. तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. फिर्यादीचा आणि त्यांच्या मुलाचा सांभाळ करण्यास आरोपींनी नकार दिला. आरोपी काकाने फिर्यादी महिलेला समजावण्याच्या बहाण्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवतळे तपास करीत आहेत.