विवाहबाह्य संबंधांसाठी केवळ पुरुषांना दोषी धरणे चुकीचे – सर्वोच्च न्यायालय

68

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने, विवाहबाह्य संबंधांसाठी केवळ पुरुषांना दोषी धरुन त्यांना शिक्षा देणे चुकीच असल्याचे म्हटले आहे. केवळ पुरुषांना शिक्षा देणं हे घटनेच्या १४ व्या अनुच्छेदानुसार मिळालेल्या समानतेच्या अधिकाराचे प्राथमिकदृष्ट्या उल्लंघन असल्याचे मत खंडपीठाने व्यक्त केले आहे.