विरोधी पक्षाने नाकावरचा मास्क तोंडाला बोळा म्हणून वापरावा – शिवसेना

139

मुंबई,दि.२१(पीसीबी) – विरोधी पक्षाने नाकावरचा मास्क तोंडाला बोळा म्हणून वापरावा, असं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

महाराष्ट्रात सीबीआय, ईडी वगैरेतून निर्माण झालेला सूडाचा विषाणू ठाकरे सरकारने मारला तसा कोरोनाचा विषाणू मारला जाईल. तोपर्यंत विरोधी पक्षाने नाकावरचा मास्क तोंडाला बोळा म्हणून वापरावा हे बरे, असं सामना मध्ये म्हटलं आहे. भाजपचे भाडोत्री बगलबच्चे मानवतेचे शत्रू आहेत. ही वेळ एकमेकांवर दोषारोप करण्याची, राजकीय कुरघोड्या करण्याची नसून एकमेकांना सहकार्य करून ‘कोरोना’ नावाच्या महामारीपासून महाराष्ट्राला व देशाला वाचवण्याची असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, राज्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी देवेंद्र फडणवीस यांची गरज असल्याचं राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपवासी झालेले निरंजन डावखरे यांनी म्हटलं होतं. यावरून शिवसेनेनं आता भाजपवर निशाणा साधला आहे.