विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा; भाजपचा पलटवार

922

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरू असलेल्यापारदर्शक कारभारामुळे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची तोडपाणीबंद झाली आहे. अधिकारी आणि ठेकेदारांना दमबाजी करूनहीहातात काहीच पडत नसल्यामुळे त्यांना नैराश्य आले आहे. त्यामुळे साने यांच्यासमोर महापालिकेच्या कारभाराबाबत फक्त बोंब मारण्यापलीकडे काहीच पर्याय उरलेला नाही. त्यामुळे ऊठसूठ बोंबठोकण्यातच ते धन्यता मानत आहेत. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो, त्याप्रमाणे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शहरातील मतदार राष्ट्रवादीचा फडफडणारा दिवा कायमचा विझवतील, असापलटवार पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे प्रवक्ते अमोल थोरात यांनी केला आहे.

अमोल थोरात यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “दत्ता साने यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठ्याविश्वासाने विरोधी पक्षनेतेपद दिले. परंतु साने यांनी या पदाचागैरवापर सुरू केला आहे. त्यांच्याकडून शहरातील लोकांची दररोजदिशाभूल सुरू आहे. आधी त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यानंतरआपली दुकानदारी जोमात सुरू होईल, असे वाटले होते. परंतु, महापालिकेतील पारदर्शक कारभारामुळे त्यांचा भ्रमनिराश झाला. अधिकारी आणि ठेकेदारांना दमबाजी करूनही काहीच फरक पडत नसल्यामुळे त्यांना नैराश्य आले आहे. अनेक प्रकरणाची माहिती मागवूनही त्यात काहीच सापडत नसल्यामुळे साने यांनी बोंब ठोकण्याचा मध्यम मार्ग निवडला आहे.

प्रसिद्धीपत्रके काढायची आणि बोंब ठोकायचे, असा त्यांचा दिनक्रम बनला आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना स्वतःच्या पक्षाने १५ वर्षांत किती भ्रष्टाचार केला, याचा विसर पडला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात गोरगरीब नागरिकांना निकृष्ट दर्जाची घरे देऊन त्यांची फसवणूक केली. मताच्या राजकारणापायी या प्रकल्पात बोगस लाभार्थी घुसवून खऱ्या लाभार्थ्यांना देशोधडीला लावले. या प्रकल्पाचे काम जादा दराने ठेकेदारांना देण्यात आले. बोगस लाभार्थ्यांच्या प्रकरणात तर पोलिस चौकशी सुरू आहे. भ्रष्टाचारासाठी देवालाही न सोडणाऱ्याराष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आता सत्ता गेल्यानंतर भ्रष्टाचारावर बोलणे म्हणजे “उलटा चोर कोतवालको डाँटे”, असा प्रकार आहे. गॅस शवदाहिनीच्या खरेदीतून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न केला. दत्ता साने यांनी राष्ट्रवादीचा हा सर्व भ्रष्टाचारी प्रताप शहरातील जनता विसरल्याच्या भ्रमात राहू नये.

पाणी, कचरा आणि अन्य मूलभूत प्रश्नांवर सातत्याने बोंब ठोकणाऱ्या दत्ता साने यांनी या सर्व समस्या म्हणजे आपल्याच पक्षाने शहराला दिलेली देण आहे, हे लक्षात ठेवावे. शहराचे वाढते नागरीकरण आणि पायाभूत सुविधांवर येणारा ताण याचा विचार न करता राष्ट्रवादीने तब्बल १५ वर्षांची सत्ता उपभोगली. दीड दशक सत्तेत राहूनही वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे सुचले नाही. केवळ कागदीघोडे नाचवण्यापलीकडे ठोस काही केले नाही. कचऱ्याची समस्याही सोडवता आली नाही. उलट स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आपले कार्यकर्ते जगवण्यासाठी ती अधिक गुंतागुतीची करून ठेवली. राष्ट्रवादीने केलेल्या या पापामुळेच पाण्याचा आणि कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडविताना अडचणी निर्माण होत आहेत. परंतु, या दोन्ही प्रश्नांवर भाजप निश्चितच भविष्यकालीन विचारकरून कायमस्वरुपी उपाय करेल, हे आज बोंबा मारणाऱ्यांनी लक्षात ठेवावे.

विरोधी पक्षनेत्याने महापालिकेच्या कारभारावर अंकुश ठेवण्याचे काम करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात आपणाला काही मिळत नाही म्हणून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात दररोज बोंब ठोकण्याची राष्ट्रवादीची ही राजकीय कला आता जनतेला चांगलीच समजली आहे. प्राधिकरणाच्या जागा विकून गब्बर झालेल्यांनी आता दुकानदारी बंद झाल्यानंतर तोडपाण्यासाठी मोघम आरोप करण्याचा धंदा कायमचा बंद करावा. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो, त्याप्रमाणे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शहरातील मतदार राष्ट्रवादीचा फडफडणारा दिवा कायमचा विझवतील, असा प्रतिहल्ला त्यांनी केला आहे.”