विराट कोहली भारताचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू

49

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या शिरपेचात आणखी एका मानाचा तुरा खोवला आहे. सलग दुसऱ्या वर्षी विराट कोहली बीसीसीआयचा ‘क्रिकेटर ऑफ दि इयर’ ठरला आहे.

२०१६-१७ आणि २०१७-१८ च्या मोसमातील भारताचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून पॉली उम्रीगर पुरस्काराने विराटला गौरवण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी बीसीसीआयने नुकतीच विराटच्या नावाची घोषणा केली.

बंगळुरुमध्ये १२ जूनला बीसीसीआयच्या एका कार्यक्रमात विराटला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

याशिवाय महिला क्रिकेटमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर या दोघींनाही सर्वोत्तम महिला क्रिकेटर पुरस्काराने गौरवण्यात येईल.