विराट कोहली दुसरा भारतीय; कसोटी क्रिकेटमध्ये जलद ६ हजार धावा

180

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा टप्पा पार केला. विराटने इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या साऊदम्प्टन कसोटीत अँडरसनच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत सहा हजार कसोटी धावा पूर्ण केल्या.

या कामगिरीसह विराट कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावा करणारा भारताचा दहावा फलंदाज ठरला आहे. तर सर्वात जलद सहा हजार धावा करणारा सुनील गावस्कर यांच्यानंतरचा दुसरा भारतीय ठरला आहे. गावस्कर यांनी ११७ डावांत सहा हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. विराट कोहलीने ७० कसोटी सामन्यांतल्या ११९ डावांत ही कामगिरी करुन दाखवली आहे.

सुनील गावस्करने ११७ डाव,  विराट कोहली ११९ डाव, सचिन तेंडुलकर १२० डाव, वीरेंद्र सेहवाग १२३ डाव, राहुल द्रविड याने १२५  डाव खेळले असल्याचे सांगण्यात आले आहे.