विराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड

84

लंडन, दि. ११ (पीसीबी) – विराट कोहलीला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास थोडा वेळ लागेल, असे मत वेस्ट इंडिजच्या महान कर्णधारांपैकी एक असलेल्या क्लाइव्ह लॉयड यांनी व्यक्त केले. एक चांगला कर्णधार असल्याचे संकेत विराटने दिले आहेत, पण तो यशस्वी होण्यास अजून बराच अवधी आहे, असेही ते म्हणाले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लॉयड यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारांविषयी विविध मते व्यक्त केली. ‘विराट नुकतेच कर्णधारपद सांभाळू लागला आहे. पण स्वत:ला यशस्वी कर्णधार म्हणून सिद्ध करण्यास थोडा वेळ लागेल. विराट आक्रमक नक्की आहे. आक्रमकतेला आपण वाईट म्हणू शकत नाही,’ असेही ते म्हणाले.