विमान प्रवासादरम्यान तरुणाचे पँट काढून महिला कर्मचाऱ्यासमोर अश्लील चाळे

0
706

जेद्दाह, दि. २८ (पीसीबी) – विमान प्रवासात महिला कर्मचाऱ्याने धुम्रपान करण्यापासून रोखल्याने प्रवाशाने पँट काढून अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. २४ वर्षीय तरुण मुळचा केरळचा असून सौदी एअरलाइन्सच्या विमानातून जेद्दाह ते नवी दिल्ली प्रवास करत होता. प्रवाशाची ओळख अब्दुल शाहीद शमसुद्दीन अशी पटली असून तो केरळच्या कोट्टायम येथील रहिवासी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल शाहीद शमसुद्दीन याला विमानातील महिला कर्मचाऱ्याने धुम्रपान करण्यापासून रोखलं असता सुरुवातील त्याने महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन केलं. ‘प्रवाशाने विमानात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. जेव्हा महिला कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांना मदतीसाठी बोलावलं तेव्हा त्याने पँट काढून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली’, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

विमान दिल्ली विमानतळावर लँड होताच कर्मचाऱ्यांनी विमान वाहतूक नियंत्रण विभागाला घटनेची माहिती दिली. यानंतर सीआयएसएफला कळवण्यात आलं. सीआयएसएफ जवानांनी प्रवाशाला ताब्यात घेऊन इंदिरा गांधी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये नेलं. तिथे कायदेशीर कारवाईसाठी दिल्ली पोलिसांकडे सोपवण्यात आलं. प्रवाशावार संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.