विनामास्क प्रकरणी 187 जणांवर कारवाई

78

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – घराबाहेर फिरताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. मात्र या आदेशाला धुडकावून अनेकजण विनामास्क फिरताना दिसत आहेत. अशा बेफिकीर नागरिकांवर पोलीस कारवाई करीत आहेत. मंगळवारी (दि. 18) पिंपरी चिंचवड पोलिसांनी 187 नागरिकांवर विनामास्कची कारवाई केली.

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉनचा फैलाव देखील अधिक गतीने होत आहे. तसेच कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा वेळी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असताना देखील नागरिक त्याचे पालन करताना दिसत नाही.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी मंगळवारी बेफिकीर 187 नागरिकांवर कारवाई केली.

एमआयडीसी भोसरी (22), भोसरी (00), पिंपरी (27), चिंचवड (23), निगडी (9), आळंदी (19), चाकण (00), दिघी (21), सांगवी (13), वाकड (27), हिंजवडी (6), देहूरोड (00), तळेगाव दाभाडे (4), तळेगाव एमआयडीसी (00), चिखली (00), रावेत चौकी (00), शिरगाव चौकी (00), म्हाळुंगे चौकी (16)