विनाकारण सिमेंटच्या गट्टूने मारहाण

142

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – मित्रांसोबत गाडीवरून जात असताना एका व्यक्तीला एकाने विनाकारण सिमेंटच्या गट्टूने मारून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 16) रात्री साडेदहा वाजता रामनगर, चिंचवड येथे घडली.

राहुल रणवीरसिंग गौतम (वय 32, रा. ताम्हाणेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 18) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैभव माने (रा. रामनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रांसोबत दुचाकीवरून जेवण करण्यासाठी जात होते. ते रामनगर येथील दत्ता ज्वेलर्सच्या दुकानासमारो आले असता आरोपी वैभव माने याने काहीही कारण नसताना सिमेंटच्या गट्टूने फिर्यादी यांना डोक्यात मारले. त्यात फिर्यादी जखमी झाले. पोलीस हवालदार धर्मा झांझरे तपास करीत आहेत.