विनयभंगप्रकरणी तरुणास अटक

48

चाकण, दि. २१ (पीसीबी) – महिलेला स्वतःसोबत राहण्यास भाग पाडून खाजगी फोटो काढले. तसेच महिलेला मारहाण करून दूर गेल्यानंतर तिचा पाठलाग करून विनयभंग केला. या प्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना 5 डिसेंबर 2020 ते 20 जुलै 2021 या कालावधीत आंबेठाण चौक चाकण येथे घडली.

अक्षय आप्पासाहेब राऊत (वय 25, रा. आंबेठाण चौक, चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय याने पीडित महिलेला धमकी देऊन त्याच्यासोबत राहण्यास भाग पाडले. दरम्यान महिलेसोबत तिच्या संमतीशिवाय खाजगी फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर हाताने मारहाण केली. पीडित महिला आरोपीपासून दूर गेल्यानंतर आरोपीने तिचा पाठलाग केला. तसेच तिला फोनवर बोलून आणि मेसेज करून विनयभंग केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare