विधान परिषदेच्या ११ जागासाठी १६ जुलैला मतदान

287

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – महाराष्ट्र विधान परिषदेच्या विधानसभा सदस्यांकडून निवडून येणाऱ्या ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.१६ जुलैला मतदान होणार आहे. तर त्याच दिवशी सायंकाळी पाच नंतर मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. 
 
काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड, शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील, शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित, रासपचे महादेव जानकर यांचा कार्यकाल संपुष्टात आला आहे.

२८ जूनला अधिसुचना काढण्यात येणार आहे. ५ जुलैला अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. तर अर्जाची पडताळणी  ६ जुलैला करण्यात येणार आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख  ९ जुलैला आहे. तर मतदान १६ जुलैला सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत घेण्यात येणार आहे. मतमोजणी १६ जुलैला सायंकाळी ५ वाजल्यानंतर केली जाणार आहे.