विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन

143

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख (वय. ८४) यांचे आज (सोमवार) मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले.  किडनीच्या आजाराने ते ग्रस्त होते. बॉम्बे  रुग्णालयात उपचार सुरू  असताना   सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.   सांगली जिल्ह्यातील कोकरुड येथे मंगळवारी (दि.१५)  त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार  करण्यात येणार आहेत.  

शिवाजीराव देशमुख १९९६ आणि २००२ मध्ये विधानपरिषदेवर निवडून गेले होते. त्याआधी १९७८, १९८०, १९८५ आणि १९९० असे चार वेळा ते विधानसभेवर निवडून  आले होते.  राज्याच्या विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवडून येण्याची हॅट्ट्रिक देशमुख यांनी केली होती. देशमुख यांचा जन्म १ सप्टेंबर १९३५ रोजी सांगली जिल्ह्यात झाला होता.