विधान परिषदेची उमेदवारी न दिल्याने रिपाइंमध्ये नाराजी – रामदास आठवले

76

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – विधान परिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला भाजपने जागा न सोडल्याने रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना पसरली आहे. ही नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (गुरूवार) येथे सांगितले.  

राज्यात रिपब्लिकन पक्षाला १ मंत्रिपद १ विधानपरिषदेची जागा आणि महामंडळाची पदे देण्याची आग्रही मागणी फडणवीस यांच्याकडे केली होती. यावर पक्षश्रेष्ठींशी बोलून निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आठवले यांनी सांगितले.

विधानपरिषदेच्या ११ जागापैकी ५ जागा भाजप लढवत आहे. त्यापैकी १ जागा रिपाइंला देण्याची आग्रही मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र, रिपाइंला विधान परिषदेची जागा देण्यात डावलेले आहे. त्यामुळे रिपाइंच्या कार्यकर्त्यामध्ये नाराजी पसरल्याचे आठवले यांनी सांगितले.