विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील

147

मुंबई,दि.२९(पीसीबी) – विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी राज्यपालांनी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती केली होती. आता दिलीप वळसे पाटील यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीने हंगामी अध्यक्षपदासाठी दिलीप वळसे पाटील यांची शिफारस राज्यपालांकडे केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता वळसे पाटलांची निवड झाली आहे.

महाविकास आघाडी विश्वासदर्शक ठराव शुक्रवारी मांडण्याची शक्यता आहे. विश्वासदर्शक ठराव मंजूर करताना कोणतीही अडचण होऊ नये आणि कोणताही गडबड गोंधळ होऊ नये यासाठी वळसे पाटलांची निवड झाली आहे.

WhatsAppShare