विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीचा जाहीरनामा प्रसिध्द

216

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीचा  जाहीरनामा आज (सोमवार) मुंबईत   पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला.  याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आदी  नेते  उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले की,  महाआघाडीच्या जाहीरनाम्यात  प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, पर्यावरण, सामाजिक न्याय याचबरोबर तरूण, महिला व ज्येष्ठ नागरिक या सर्व घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा जाहीरनामा तयार करण्यात आला. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुनगीकर  यांचे विशेष योगदान  मिळाले.  आघाडीच्या  मित्र पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील यामध्ये विशेष सुचना केलेल्या आहेत.

WhatsAppShare