विद्यार्थ्यांसाठी “दृष्टीदोष निवारण अभियान“ दूधभाते नेत्रालयाचा उपक्रम

89

पिंपरी,दि.२५(पीसीबी) – दूधभाते नेत्रालय आणि आदित्य फाऊंडेशनच्यावतीने बाळ गोपाळ दृष्टीदोष निवारण अभियानातंर्गत पुणे जिल्ह्यातील एक लाख शालेय विद्यार्थ्यांची मोफत तपासणी अभियानाचा शुभारंभ कात्रज येथील स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी फाऊंडेशन संचालित शाळेत नुकताच करण्यात आला .

यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष धोंडीराम गडदे , सतीश दूधभाते , सुसंगत फाऊंडेशनचे डॉ सुधाकर न्हाळदे , संगीता न्हाळदे , भालचंद्र खराईत , पिंटू कांबळे , मुख्याध्यापक , शिक्षक व पालक उपस्थित होते . या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ८२० विद्यार्थ्यांच्या डोळयांची मोफत स्क्रीनिग करून तपासणी करण्यात आली .

चांगली दृष्टी हि सर्वांचा अधिकार आहे , आणि तो त्यांना मिळायलाच हवा यासाठी आम्ही कटिबध्द असल्याची ग्वाही डॉ अनिल दूधभाते यांनी दिली .