विद्यार्थी नेता उमर खालिदवरच्या गोळीबाराची जबाबदारी दोघांनी स्वीकारली; व्हिडिओ व्हायरल

276

दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेनंतर दिल्लीत सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दोन तरुणांनी उमर खालिदवरील गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली असून उमर खालिदवरील हल्ला देशवासियांना स्वातंत्र्य दिनाची भेट होती, असे म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कॉन्स्टिट्यूशनल क्लबच्या आवारात उमर खालिदवर अज्ञात व्यक्तीने गोळी झाडून त्याच्या हत्येचा प्रयत्न केला. हल्लेखोराने गावठी पिस्तुलने उमरवर दोन गोळ्या झाडल्या. मात्र त्याचा नेम चुकला. सुदैवाने उमर या गोळीबारातून बचावला. उमरवर गोळीबार करणारा हल्लेखोर हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या आधारे तपासही सुरु आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर दोन तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या तरुणांनी व्हिडिओत उमरवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पोलिस त्या दोघांचा शोध घेत आहेत.