विद्यापीठातील सावळ्या गोंधळावरून लक्ष उडवण्यासाठीच गीता वाटप- उद्धव ठाकरे

56

पुणे, दि. १४ (पीसीबी) – शाळांमध्ये गीता वाटप करण्यात आल्याच्या प्रकारावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर टीका केली आहे. विद्यापीठातील सावळ्या गोंधळावरून लक्ष उडवण्यासाठीच गीता वाटप करण्यात आली, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असता पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांना गीता वाटपावरून राज्य सरकारला लक्ष्य केले. गीता वाटपाऐवजी विद्यापीठाचे निकाल वेळेवर लावा, असा टोला उद्धव यांनी तावडे यांना लगावला. खड्ड्यांची जबाबदारी सर्वांचीच असल्याचे सांगत उद्धव यांनी मुंबईतील खड्ड्यांची जबाबादारीही झटकली. तर पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले असून आता ते नव्या उमेदीने कामाला लागतील, असे सांगतानाच आपणही आता पुण्यावर लक्ष केंद्रीत केले असून पुण्यात वारंवार येणार असल्याचेही स्पष्ट केले.