विठ्ठलनगर येथे दोघांवर तलवारीने वार; तिघांवर गुन्हा दाखल

70

पिंपरी, दि. 26 (पीसीबी) : विठ्ठलनगर, पिंपरी येथे तिघांनी मिळून दोघांवर वार केले. तसेच परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री आठ वाजता घडली.

रमेश अवसराम रणबागुल (वय 21, रा. नेहरूनगर, पिंपरी), मोसीन शेख अशी जखमींची नावे आहेत. रमेश यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिनेश बिल्लू गोधडीया (वय 25), नरेश बिल्लू गोधडीया (वय 38, दोघे रा. विठ्ठलनगर, पिंपरी)  आणि एक अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे विठ्ठलनगर येथे त्यांच्या जुन्या घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवले. ‘त्या सांडयाला, आम्ही कुठे थांबतो. कुठे फिरतो’ याची टीप देतो का’ असे म्हणून शिवीगाळ केली. आरोपी दिनेश याने फिर्यादी यांच्या हातावर वार केले. अन्य आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादी यांना जखमी केले. मोसीन शेख याला देखील आरोपींनी तलवारीने मारहाण केली. तसेच आजूबाजूच्या परिसरात दहशत निर्माण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare