विठ्ठलनगरमध्ये लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन तरुणीचा विनयभंग

340

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – लग्नास नकार दिल्याने तीन जणांच्या टोळक्यांनी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला दगडाने मारहाण करुन तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेनंतर हे सर्व आरोपी पसार झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.२) रात्रीच्या सुमारास विठ्ठलनगर येथे घडली.

याप्रकरणी पिडीत १६ वर्षीय तरुणींने तीन जणांविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश उर्फ चौतऱ्या सुधाकर घनघाव, सुरज घोडके आणि अंगुली घनघाव या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रीच्या सुमारास तिघे आरोपी अल्पवयीन मुलीच्या घरात जबरदस्ती शीरले. त्यांनी तिला लग्नासाठी मागणी घातली. यावर तिने स्पष्ट नकार दिल्याने. यावर रागावलेल्या आरोपींनी तिला तसेच तिच्या घरातील आई आणि दोघा बहिणींचा शिवीगाळ करुन दगडाने मारहाण केली. यामध्ये त्या जखमी झाल्या. आरोपी फरार झाले असून त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.