विठ्ठलनगरमधील तरुणाच्या खूनातील आरोपी महिलेला न्यायालयीन कोठडी 

836

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – अनैतिक संबंधातून सोमवारी (दि.३) शेजारी राहणाऱ्या एका विवाहित तरुणाच्या मानेवर कुऱ्हाडीचे जबर घाव घालून त्याचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सविता जाधव असे आरोपी महिलेचे नाव असून तीने प्रविण भाग्यवंत (वय ३०, रा.विठ्ठलनगर) या तरुणाचा कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधातून सोमवारी (दि.३) सविता जाधव या महिलेने शेजारी राहणारा तरुण प्रविण याच्या मानेवर कुऱ्हाडीने प्राणघातक वार केले होते. या घटनेत प्रविण गंभीर जखमी झाला होता. त्याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने सविता हिला अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र पोलिस कोठडीची मुद्दत संपल्याने न्यायालयाने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.