विजय मल्ल्या भाजपचा नवा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर – उद्धव ठाकरे

60

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – हार्डवर्कर होऊ नका, फरार उद्योगपती विजय मल्ल्यासारखे स्मार्ट व्हा!, असा अजब सल्ला देऊन मोदी सरकारच्या मंत्र्यांनी भाजपचा खरा चेहरा जगासमोर उघड केला आहे, असे टीकास्त्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोडले. राहुल गांधी मुस्लिमांविषयी काय बोलतात, थरूर यांची जीभ हिंदू-पाकिस्तानविषयी कशी मोकाट सुटली आहे. या संशोधनात रस घेणाऱ्यांना आता भाजपचा नवा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर विजय मल्ल्यावर भाष्य करावे लागेल, असा टोला उध्दव ठाकरे यांनी लगावला.

‘तुम्ही विजय मल्ल्याला शिव्या देता, पण मल्ल्या कोण आहे? तो एक स्मार्ट व्यक्ती आहे. त्याने बुद्धिमान लोकांना कामावर ठेवले, असे अजब विधान केंद्रीय मंत्री जुएल ओराम यांनी केले होते. यावरून उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.   त्यांनी पंतप्रधान मोदींवरही जोरदार हल्ला चढवला.