विखेंचे विरोधक बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी

125

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – काँग्रेसचे माजी नेते व विधानसभा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारकीचा तसेच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या जागेवर पक्षाने बाळासाहेब थोरात यांची वर्णी लावली आहे.

काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी आता बाळासाहेब थोरात असणार आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांना नगरमधुन उमेदवारी न दिल्याने, सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश करत लोकसभा निडवणुक लढवली व यात त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा पराभव केला. काँग्रेसच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणे उघडपणे टाळले होते. निवडणुक निकालानंतर त्यांनी भाजपात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट संकेतही दिले. त्याच्याबरोबर काँग्रेसचे काही आमदारही भाजपाच्या वाटेवर असल्याची खात्री लायक माहिती आहे.