विंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

336

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – विंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेतल्या पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली आहे. एम एस के प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय निवड समितीने १४ सदस्यांचा भारतीय संघ जाहीर केला.

निवड झालेल्या भारतीय संघात युवा यष्टिरक्षक रिषभ पंत हा एकमेव नवा चेहरा असेल. रिषभ पंतचा दिनेश कार्तिकच्या जागी संघात समावेश करण्यात आला आहे. भारत आणि विंडीजमधल्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २१ ऑक्टोबरला खेळवण्यात येईल.

पहिल्या दोन वन डे साठी कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, लोकेश राहुल, मनिष पांडे, यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी, रिषभ पंत, रवींद्र जाडेजा,  यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद आणि शार्दूल ठाकूर असे निवड करण्यात आलेल्या भारतीय संघातील खेळाडूंची नावे आहेत.