वाहनाच्या धडकेत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू..

37

औंध, दि. २९ (पीसीबी) – अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 28) रोजी पहाटे चार वाजता औंध हॉस्पिटल समोर घडली.रोहितसिंग गौड (वय 20) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मुकेशसिंग शंगरसिंग गौड (वय 19, रा. भोईरवाडी, हिंजवडी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा मयत रोहितसिंग बुधवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास औंध हॉस्पिटल समोरून जात होता. त्यावेळी अज्ञात वाहनाने रोहितसिंग याला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रोहितसिंगचा मृत्यू झाला. घटनेची माहिती न देता आरोपी वाहनचालक घटनास्थळी न थांबता निघून गेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare