वाहनाचा बल्ब खरेदी करण्यासाठी आलेल्या तिघांनी दुकानदाराचा मोबाईल पळवला

45

पिंपरी, दि.२४ (पीसीबी) : वाहनाचा बल्ब खरेदी करण्यासाठी आलेल्या तीन अनोळखी इसमांनी दुकानदाराचा मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 23) सायंकाळी साडेपाच वाजता वाकड-हिंजवडी रोडवरील पाचारणे टु व्हीलर एक्सेसरीज या दुकानात घडली.

शंकर आप्पा पाचारणे (वय 57, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दुकानात शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता एका मोपेड दुचाकीवरून तीन अनोळखी इसम बल्ब घेण्यासाठी आले. फिर्यादी यांनी त्यांचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन काउंटरवर ठेवला होता. ग्राहक बनून आलेल्या अनोळखी इसमांनी फिर्यादी यांचा मोबाईल फोन चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare