वाहनांची तोडफोड करणाऱ्या ‘त्या’ आरोपींवर दरोड्याचाही गुन्हा

199

भोसरी, दि. ३० (पीसीबी) – साई पार्क दिघी येथे वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींनी एका व्यक्तीला तलवारीने मारून त्याच्या खिशातून रोख रक्कम काढून नेली. याप्रकरणी आरोपींच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या आरोपींवर तोडफोड आणि दोघांवर खुनी हल्ला केल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 28) रात्री घडली.

अर्जुनसिंग, संग्रामसिंग, सुरजितसिंग, करणसिंग आणि त्यांचे दोन ते तीन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संदीप उद्धव तिगलपल्ले (वय 35, रा. साई पार्क, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तलवारी, कोयते घेऊन साई पार्क परिसरात दहशत निर्माण केली. तसेच त्यांनी वाहनांची तोडफोड देखील केली. दहशत निर्माण करून आरोपी फिर्यादी यांच्याकडे आले. फिर्यादी यांना खाली पाडून तलवारीने त्यांच्या पायावर वार केले. तसेच त्यांच्या खिशातून रुपये रोख रक्कम काढून नेली. पोलिसांनी आरोपी संग्रामसिंग आणि सुरजितसिंग या दोघांना अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.