वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन समोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या एका मोटारीत प्रेत

270

पिंपरी, दि 1 ( पीसीबी) चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथील रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटारीत एकाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडला. हा प्रकार सोमवारी (ता. 1) सायंकाळी सातच्या सुमारास उघडकीस आला.

जयसिंग गायकवाड (वय 58, रा. चिंचवड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गायकवाड हे 28 मेपासून घरातून गायब होते. दरम्यान, वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन समोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या एका मोटारीतून उग्र वास येऊ लागल्याने येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी या बाबत चिंचवड पोलिसांना माहिती दिली. 

पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मोटारीचा दरवाजा उघडला असता गायकवाड यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

WhatsAppShare