वाल्हेकरवाडीत संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा उत्साहात साजरा

17

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी -चिंचवड नामदेव शिंपी समाज संस्थेच्या वतीने श्री संत नामेदव महाराज यांचा ६६८ वा संजीवन समाधी सोहळा विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच यावेळी शिंपी समाज संस्थेच्या अध्यक्षपदी  मोहन मुळे यांची फेरनिवड करण्यात आली.

चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील मंदिरात १० ऑगस्ट रोजी सकाळपासून विविध कार्यक्रम घेण्यात आले. विठ्ठल रूक्मीणी व नामदेव महाराज यांच्यामूर्तीला अभिषेक घालण्यात आला. सत्यनारायण महापूजा करण्यात आली. आणि गजानन महाराजांचे भजन व हरीपाठ, तसेच समाधी सोहळ्यावरपुष्पवृष्टी करण्यात आली. महाप्रसादाचे वाटप करण्यात  आले. महाप्रसादाचे आयोजन अनिलकुमार निखळ यांनी केले. मोठ्या संख्येने समाजबांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.

त्यानंतर शिंपी समाज संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. सभेत आगामी कार्यकारणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी मोहन मुळेयांची फेरनिवड करण्यात आली.  उपध्याक्षपदी एकनाथ सदावर्ते, अनील पोरे, सुरेश परदेशी, अनिल कुमठेकर, सचिवपदी प्रशांत बेंद्रे, खजिनदार प्रकाशसुपेकर, औदुंबर बगाडे,  सल्लागार रामदास पिसे, पुरूषोत्तम खर्डे, अशोक बाचल, नंदाराम नांगरे, मंदिर व्यवस्थापकपदी दता अवसरकर, ज्ञानेश्वरतांदळे, सोमनाथ पतंगे, चंद्रशेखर क्षिरसागर, निवृती काकडे  यांची निवड करण्यात आली.