वाल्हेकरवाडीत लक्ष्मणभाऊ जगताप युवा मंचाच्या वतीने शिक्षकांचा गौरव   

118

चिंचवड,दि. २८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाल्हेकरवाडी प्राथमिक शाळेमध्ये आमदार लक्ष्मणभाऊ जगताप युवा मंचाच्या वतीने गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून शाळेतील शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

यावेळी रोहिणी जोशी म्हणाल्या की, वाल्हेकरवाडी ग्रामस्थांच्या सहकार्यतून आणि आम्हाला दिलेल्या पाठिंब्यामुळे वाल्हेकरवाडी शाळा ही शिक्षण मंडळातील आवर्जून उल्लेख करण्यासारखी शाळा नक्कीच आहे. इतर शाळांची पटसंख्या कमी होत असताना या शाळेत मात्र १०००पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत.

संदिप शिवले म्हणाले की,  शिक्षक एक नवी पिढी घडविण्याचे काम करत असतात. या शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी हे डॉक्टर, इंजिनिअर, सीए, उद्योजक झाले आहेत आणि ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. ज्या शाळेत शिक्षणाचा श्रीगणेशा केला. त्या शाळेतील शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दर वर्षी हा कार्यक्रम घेण्यात येतो.

युवा नेते सचिन शिवले यांनी विद्यार्थी व शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रम ‘ब’ प्रभाग अध्यक्ष करुणाताई चिंचवडे, माजी सत्तारूढ पक्षनेते शामराव वाल्हेकर, विठ्ठल भोईर, बिभिषण चौधरी, पाटील चिंचवडे, मनोज तोरडमल, गंगा शिवले, दिलीप गडदे, हेंमत ननवरे, कमलाकर गोसावी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन भाजप युवा नेते सचिन शिवले, वाल्मिक शिवले, सचिन काळभोर, सागर भोंडवे, सुनिल दास, अमोल भोसले यांनी केले. सूत्रसंचालन संदिप शिवले यांनी केले.  आभार वाल्मिक शिवले यांनी मानले.