वाऱ्याची दिशा समजल्याने शरद पवारांची माढ्यातून माघार – विजय शिवतारे

156

पुणे, दि. १४ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाऱ्याची दिशा समजली आहे. त्यामुळे त्यांनी माढा लोकसभा मतदार संघातून माघार घेतली, असा टोला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज (गुरूवार) येथे लगावला.

पुण्यातील वैशाली हॉटेल येथील कट्ट्यावर विजय शिवतारे  पत्रकारांशी  बोलत होते. यावेळी  ते म्हणाले की, शरद पवार यांचे कार्य खूप मोठे आहे. परंतु मागील निवडणुकीतील माढामधील कामाबाबत जनतेमध्ये शरद पवार यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे, असे शिवतारे म्हणाले .

सध्या मावळमधून पार्थ पवार आणि नगर येथून सुजय विखे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे. या दोघांचे काय कर्तुत्व आहे. ते केवळ नेत्यांची मुले आहेत म्हणून त्यांना उमेदवारी देणार का? असा सवाल त्यांनी केला.   या दोघांनी किमान दहा वर्ष समाजासाठी काम करणे आवश्यक आहे. मगच त्यांनी उमेदवारीचा विचार करावा, असे ते म्हणाले.