वारजे माळवाडीत विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू

203

पुणे, दि. १८ (पीसीबी) – पुण्यातील वारजे माळवाडी येथे सायकल चालवताना विजेच्या खांबाचा शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवार) सकाळी १०.३० च्या सुमारास आरएमडी महाविद्यालयासमोर  घडली.

पृथ्वीराज विशाल चव्हाण असे या मुलाचे नाव आहे. तो रोजरी शाळेत ६ वीत  शिकत होता. त्याचे वडिल विशाल चव्हाण हे पोलीस पाटील होते. तो  वारजे माळवडीतील ११ साई सोसायटीमध्ये राहत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज हा ११ वर्षांचा मुलगा रोज सकाळी सायकल चालवत असे. आज सकाळी १०.३० च्या सुमारास मित्रासोबत आरएमडी महाविद्यालयासमोर असलेल्या सायकल ट्रॅकवर पृथ्वीराज सायकल चालवत होता. त्यावेळी त्याला विजेच्या खांबाचा शॉक लागला. या घटनेनंतर तेथील नागरिकांनी  पृथ्वीराजला मंगेशकर रूग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.