वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टचे पथक पंढरपूरला रवाना

76

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – चैत्री एकादशी यात्रे साठी पंढरपूरात येणाऱ्या  लाखो वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी निगडी, प्राधिकरणातून वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टचे डॉक्टर व स्वयंसेवकांचे  पथक आज(रविवार) सकाळी पंढरपूरला रवाना झाले.

पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मध्ये २४ तास  वारकऱ्यांना या पथकांकडून  मोफत वैद्यकीय  सेवा  व औषधांचे वाटप करण्यात येणार आहे.

पुणे जिल्हा वारी व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मुकेश सोमैय्या, वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट चे विश्र्वस्त  श्रीराम नलावडे व कमलाकर कुलकर्णी यांच्या उपस्थितीत  रूग्णवाहिकेसमोर श्रीफळ फोडून पुजा करुन या पथकाला निरोप  देण्यात आला.

या  पथका मध्ये  विश्वस्त   सुरेश मानकुमरे,  प्रभाकर कोंबेकर,  डॉ. प्रदीप पाटील, सिताराम अहेर, किशोर गायकवाड,  संतोष नलवडे व सातव  आदी सहभागी झाले आहेत .