वारकऱ्यांना अन्नदान करण्यासाठी गेलेल्या महिलेला ट्रकने चिरडले

80

सातारा, दि. १५ (पीसीबी) –  पती आणि मुलांसोबत पालखीतील वारकऱ्यांना अन्नदान करण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा ट्रकखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना लोणंद येथे घडली.

कविता तोष्णीवाल असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता तोष्णीवाल या महाबळेश्वर येथील एका कापड व्यवसायिकाची पत्नी आहेत. काल ज्ञानोबांची पालखी लोणंदवरुन फलटणला जात होती. कविता तोष्णीवाल रस्ता ओलांडताना त्यांचा अपघात झाला. त्या ट्रकखाली चिरडल्या गेल्या. अपघातावेळी दोन लहान मुलेही त्यांच्यासोबत होती. सुदैवाने ती बचावली. अपघाताची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.