वापरा आणि फेका हीच प्रकाश आंबेडकरांची नीती – लक्ष्मण माने

108

पुणे, दि. १० (पीसीबी) –  वंचित बहुजन आघाडीत पार्लमेंटरी बोर्ड फक्त नावालाच होत. तिकीट वाटप करताना आम्हाला विचारत घेतले नाही. तसेच वंचित आघाडी उभारताना आम्ही कष्ट घेतले पण त्या कष्टाचे चीज झाले नाही. ‘वापरा आणि फेका’ हीच प्रकाश आंबेडकरांची नीती आहे,” असा गंभीर आरोप माजी आमदार लक्ष्मण माने यांनी आंबेडकरांवर केला आहे.

एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी युती तुटण्याची चर्चा सुरु आहे. त्याबद्दल बोलताना माने यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

माने वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक सदस्य आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर माने यांनी वंचित बहुजन आघाडीशी फारकत घेतली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यात वंचितांचे राजकारण उभे राहील असे वाटत होते, पण चुकीची माणस आमच्या पक्षात घुसली आणि ज्यांनी कष्ट केले ते लोक मात्र पक्षातून बाहेर पडले, असे देखील माने यांनी यावेळी सांगीतले आहे.