वानवडी पोलिस ठाण्यातील हवालदाराची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

299

पुणे, दि. १२ (पीसीबी) – वानवडी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस हवादाराने रेल्वेखाली उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. ही घटना आज (रविवारी) दुपारच्या सुमारास हडपसर रेल्वे स्टेशन जवळील काळेपडळ येथून उघडकीस आली.

डी.पी. गजरमल असे आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (रविवार) दुपारच्या सुमारास डी.पी.गजरमल यांचा मृतदेह  हडपसर रेल्वे स्टेशन जवळील काळेपडळ येथे आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही. लोहमार्ग पोलिस तपास करत आहे.

दरम्यान गजरमल हे अत्यंत मनमिळावू व्यक्ती होते अशी माहिती वानवडी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांनी दिली आहे. ते ८ ऑगस्ट पासून सिक लिव्हवर होते.